पिंपळगाव बसवंत : शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख लक्षात घेता, प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा वाढविण्याची मागणी ग्रामपालिका पिंपळगाव बसवंतच्या वतीने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश टोपे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व आमदार दिलीप बनकर आदींकडे करण्यात आली आहे.पिंपळगाव बसवंत हे व्यापारी शहर असल्याने कामानिमित्त व बाहेरून आलेल्यांची संख्या देखील प्रचंड आहे. आणि परिसरातील इतर दहा गावांचा देखील याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी समावेश आहे. त्यामुळे कोवीड प्रतिबंधक लस पुरवठ्याची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे पुरवठा वाढवावा अशी मागणी करणज्यात येत आहे.पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोवीड प्रतिबंधक लस पुरवठा सुरु आहे, मात्र आतापर्यंत फक्त नऊ हजार लसीचा पुरवठा केला आहे. तर इतर दोन खाजगी हॉस्पिटलमधून फक्त प्रत्येकी एक- एक हजार पुरवठा केला आहे.पिंपळगाव व इतर दहा गावांची लोकसंख्या बघता अजून हजारो नागरीक लसीकरणापासून वंचित आहे त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा पुरवठा वाढवाव तसेच कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत असेल तर ग्रामपालिकेमार्फत तो देखील पुरवठा केला जाईल त्यामुळे प्रशासनाने देखील लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ती मदत ग्रामपालिकेमार्फत केली जाईल असे ग्रामपंचायतीच्या मार्फत सांगण्यात आले आहे.पिंपळगाव बसवंत शहर तसेच इतर दहा गावांचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रावर लाखो नागरिकांना कोवीड प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करावी लागत आहे त्यामुळे शासनाने पिंपळगाव बसवंत येथे लसीकरणासाठी अजून एक केंद्र वाढवुन जास्तीत जास्त कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा पुरवठा करावा तसेच कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत असेल व ग्राम पालिकेमार्फत तो देखिल पूर्ण केला जाईल त्यामुळे प्रशासनाने फक्त प्रतिबंधक लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.- गणेश बनकर, सदस्य, पिंपळगाव ग्रामपंचायत.
कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 10:26 PM
पिंपळगाव बसवंत : शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आलेख लक्षात घेता, प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा वाढविण्याची मागणी ग्रामपालिका पिंपळगाव बसवंतच्या वतीने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश टोपे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व आमदार दिलीप बनकर आदींकडे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपिंपळगाव ग्रामपालिकेची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी