शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

भाम, कडवा धरणात पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 11:23 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दारणा, भावली धरणात जलसाठा परिपूर्ण झाल्याने या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच भाम व कडवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने या धरणातही जलसाठा झपाट्याने वाढला आहे. ही दोन्ही धरणे ६० टक्क्यांच्या वर भरली आहे.

ठळक मुद्दे इगतपुरी तालुका : दारणा, भावलीतून विसर्ग

घोटी : इगतपुरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दारणा, भावली धरणात जलसाठा परिपूर्ण झाल्याने या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच भाम व कडवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने या धरणातही जलसाठा झपाट्याने वाढला आहे. ही दोन्ही धरणे ६० टक्क्यांच्या वर भरली आहे.इगतपुरी तालुक्यात सहा मोठे प्रकल्प हे नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. दारणा धरणात जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार ७८ टक्के जलसाठा स्थिर ठेवून उर्वरित पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर भावली हे धरणही ओव्हरफ्लो झाल्याने आता याही धरणातून दारणापात्रात विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील भाम धरणात आजस्थितीत झपाट्याने वाढ झाली आहे. हे धरण ७७.७५ टक्के भरले आहे तर कडवा धरणात ६० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर मुकणे धरणातही ४८.२९ टक्के तर वाकी धरणात अवघा ३९.७७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. अप्पर वैतरणा धरणात ६८ टक्के साठा उपलब्ध झाला आहे.दारणा धरणातून ५५४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून भावली धरणातूनही २९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अद्यापही पावसाच्या सरी कोसळत आहेत.---------------------------इन्फोधरणांचा आजचा उपलब्ध साठादारणा - ७७.७५ टक्केभावली - १०० टक्केभाम - ७२.७१ टक्केकडवा - ६० टक्केमुकणे - ४८.२९वाकी - ३९.७७अप्पर वैतरणा - ६८ टक्के

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण