लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. परिसरातील ओढे, नाले भरून वाहिल्याने भोजापूर धरणात १९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरात शेती कामांना वेग आला आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस चास खोºयात पावसाने जोरदार हजेरी लावली. या खोºयातील करवंददरा परिसरात सुमारे चार तास जोरदार पाऊस झाल्याने या भागातील डोंगरावरून पाण्याचे धबधबे वाहू लागले होते.या परिसरातील नाल्याला त्यामुळे पूर आला होता. शेतामध्ये, छोट्या-मोठ्या ओढ्यांमध्ये पाणी साचल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. भोजापूर धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील ओढे-नाल्यांचे पाणी धरणातून येऊन मिळाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाळ्याच्या प्रारंभीच वरुणराजा बसल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. जूनमध्ये प्रथमच पावसाचे पाणी आल्याने मनेगावसह १६ गावे व कणकोरीस पाच गाव पाणी पुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे.३६१ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणात पावसाळा सुरू होण्यापूर्वी २० दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. त्यात आता १९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होऊन साठा ३९ दशलक्ष घनफूटझाल्याची माहिती शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके यांनी दिली. दरम्यान, परिसरात झालेल्या या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनावेग येणार आहे.
भोजापूरच्या पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 9:15 PM
नांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देपाणी पूरवठा योजनांना संजीवनी : परिसरातील शेतकऱ्यात समाधान