अस्ताणे : यंदा झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच शेतकऱ्यांना या वर्षी गहू, हरभरा, गुरांसाठी चारा म्हणून ज्वारी हे पीक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी यावर्षी गहू व हरभºयाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.यंदा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने व गावाजवळील कोल्हापूर पद्धतीचा केटीवेअरमध्ये जलसाठा झाला आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. कारण या शेततळ्यांमुळे पाण्याची पातळी वाढली आहे. उन्हाळ्यात ज्या विहिरींना पाणी राहत नव्हते त्या विहिरींना या केटीवेअरमुळे पाणी आहे. त्यामुळे सर्वच परिसर आता हिरवागार दिसत आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला त्यामुळे शेतकºयांकडे चारा वा दाना दोन्ही खराब झाला होता. आता गहू, हरभरा व गुरांनासाठी चारा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
गहू, हरभरा, ज्वारी उत्पन्नात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:16 PM