पेठ : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पेठ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या दोन कोविड केअर सेंटर सोबत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तसेच इनामबरी येथील शासकीय आश्रम शाळेची इमारत अधिग्रहित करण्याच्या सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या.
पेठ येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील कोरोना संदर्भात आढावा घेऊन उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० बेडचे कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. तसेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन इनामबरी येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे, कोविड नोडल अधिकारी डॉ. मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, नायब तहसीलदार सुदेश निरगुडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित नाईक यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-------------------
कोविड केअर सेंटरला भेट व पाहणी
बोर्डींगपाडा येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरला झिरवाळ यांनी भेट देऊन सुविधांची पाहणी करून बाधित रुग्णांची विचारपूस केली. या ठिकाणी नेमणूक केलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बाधित रुग्णांना योग्य त्या सेवा पुरविण्यात याव्यात याबाबत त्यांनी चर्चा केली. या ठिकाणी सध्या २७ रुग्ण उपचार घेत असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीत ग्रामीण २२ ऑक्सिजन बेडची उपलब्धता असून उर्वरित बेडला त्वरित ऑक्सिजन लाईनची व्यवस्था करणे विषयीच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामीण रुग्णालय पेठ हे संपूर्ण रुग्णालय कोविड रुग्णांसाठी सज्ज करण्याचे आदेश दिले. सध्या सुरू असलेल्या नाॅन कोविड आंतररुग्ण कक्षामध्येदेखील वाढीव ३० बेडसाठी ऑक्सिजन लाईन बसविणे याविषयी आदेश देण्यात आले. यावेळी उपलब्ध रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडरचा देखील आढावा घेतला.
---------------
पेठ येथील कोविड केअर सेंटरला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट देऊन आढावा घेतला. (१७ पेठ १)
===Photopath===
170421\17nsk_19_17042021_13.jpg
===Caption===
१७ पेठ १