लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून, सकाळी महापूजा करण्यात आली.चौथ्या माळेची महापूजा मुंबईचे अॅड.सुरेश पाकळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, उपसरपंच राजेंद्र गवळी, प्रशांत निकम, किरण राजपूत आदी उपस्थित होते.सप्तशृंगीदेवीला चढविलेल्या गुलाबी रंगांच्या अकरा वार पैठणीने देवीचे रूप अधिक उठून दिसत होते. भगवतीला चांदीचा मुकुट, गळ्यात गुलाब हार, मयूरहार, मंगळसूत्र, कर्णफुले, नथ, सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे, सुवर्ण पादुका तसेच नागीन पानाचा सुंदर दिसणारा हार असे अलंकारांनी भगवतीचे रूप खुलून दिसत होते. गुजरात राज्यातून पायी दिंडीपांडाणे : सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गुजरात राज्यातून पायी दिंडीने भाविक गडाकडे येत आहेत. वापी व बलसाड जिल्ह्यातील कपराडा गावातून सुतार पाडामार्गे दोनशे किलोमीटरचे अंतर चार मुक्काम करत सप्तशृंगीदेवीच्या चरणी लीन होत आहेत. हातात भगवी पताका, टाळ-वीणा, पावरी, सप्तशृंगीमातेची पालखी, भालदार-चोपदार व भगवतीच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून जात आहे. गडावर नवरात्रानिमित्त यात्रा सुरू असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून व गुजरात राज्यातून पायी भाविक येत असतात. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे बरेच भाविक शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली असली तरी सातव्या माळेला विशेष गर्दी असते.
गडावर भाविकांची वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:47 PM
पांडाणे : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून, सकाळी महापूजा करण्यात आली.
ठळक मुद्देभाविकांची संख्या कमी झालेली असली तरी सातव्या माळेला विशेष गर्दी असते.