नाशिक : अधिकमासानिमित्त कपड्यांचे मार्केट पुन्हा एकदा गजबजलेले दिसत आहे. लेकीला साडी, तर जावयाला ड्रेस, भाचे, नातवंडांनाही आकर्षक कपडे देण्यावर भर दिला जात असून, आवडीच्या कपडे खरेदीसाठी सध्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. कपड्यांचे भाव सध्या स्थिर आहेत. ब्रॅँडेड आणि हजार रुपयांच्या वर ड्रेस, साडी खरेदी केल्यास त्यावर जीएसटी लागू केला असल्याने कपड्यांच्या किमती थोड्या वाढल्या आहेत. मात्र सर्व प्रकारच्या कपड्यांचे दर दिवाळीसारखेच स्थिर आहेत. त्यामुळे आणि लग्नसराई नुकतीच आटोपल्याने कापडपेठांमध्ये नवनवीन फॅशनच्या वस्त्रांची मालिका पहायला मिळत आहे. पुरुषांसाठी शर्ट, पॅँट, ट्राऊझर, सलवार, कुर्ती, जीन्स, मोदी जॅकेट, फॅशनेबल टी शर्टस, सोवळे, शाल, शेला आदींची खरेदी केली जात आहे. तयार कपड्यांबरोबरच ब्रॅँडेड शुटिंग, शर्टिंग कापडालाही मागणी आहे. लग्नसराईत साड्यांना असलेल्या मागणीच्या तुलनेत सध्या त्याचे प्रमाण कमी असले तरी नवीन लग्न झालेल्या लेकीला आणि तिच्या घरच्या महिलांना मात्र आवर्जून साडी घेतली जात आहे. साडीबरोबरच कुणी फॅशनेबल रेडिमेड पंजाबी सुट््स, अनारकली, सुती, सिंथेटिक ड्रेस मटेरियल आदींनाही पसंती देत आहे. कपड्यांच्या दुकानांमध्ये विविध सवलती, आॅफरही जाहीर करण्यात आल्या आहेत. कुणी एकावर एक कपडा मोफत, तर कुणी साडी खरेदीवर चांदीच्या वस्तू मोफत देत आहेत. बजेटनुसार कपड्यांची २०० ते १००० रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. साड्यांमध्ये चंदेरी, कांजीवरम, धर्मावरम, कोटा सिल्क, सुपरनेट, आसामसिल्क, कसावू, नारायणपेठ अशा पारंपरिक साड्यांबरोबरच असंख्य नवनवीन प्रकार आल्याने व सध्या टीव्ही, सिनेमांमधून प्रसिद्ध झालेल्या साड्यांचे अनेक प्रकार सर्वसामान्य महिलांना आवडू लागल्याने त्यांनाही चांगली मागणी दिसून येत आहे.आॅनलाइन शॉपिंगवरही भरउन्हाळी सुट्यांचा कालावधी लक्षात घेऊन आॅनलाइन शॉपिंग संकेतस्थळांनी कपड्यांवर अनेक चांगल्या आॅफर्स जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी आता ग्राहक सरसावले आहेत. आवडीच्या अद्ययावत फॅशनची कपडे खरेदी व इतर वस्तूंची खरेदीही जोरात सुरु आहे. सध्या आॅनलाईन शॉपिंगबद्दल ग्राहकांमध्ये मोठ््या प्रमाणात आवड निर्माण झाल्याचे दिसून येत असून, मागणी वाढली आहे.
फॅशनेबल तयार कपड्यांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:28 AM