नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर के.के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. सर्व्हिस रोडसाठी दुभाजक टाकल्यास व्यावसायिकांना फटका बसणार असल्याने सर्व्हिस रोडचा विस्तार करू नये, अशी मागणी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी या जत्रा हॉटेल ते आडगाव परिसरातील व्यावसायिक, ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने महामार्ग प्राधिकरणाचे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विनोद काठे, हरविंदर सिद्धू, सुरेश कापरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वीदेखील रस्त्याच्या कामामुळे व्यवसाय अडचणीत होते. आतादेखील काम सुरू असल्यामुळे, तसेच कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आहे. आता सर्व्हिस रोड वाढवल्यास उपजीविकेचे साधन नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढीव जागा घेऊ नये, सर्व्हिस रोडवर दुभाजक टाकू नये, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
(फोटो:१३कोणार्कनगर)