नायगाव : वाढते भारनियमन व सततचा रोहित्रांचा बिघाड यामुळे पाणी असुनही पिकांना वेळेत पाणी देणे शेतक-यांसाठी अवघड होऊन बसले आहे. शेतकरी वावरात रात्रीचा दिवस करून जिवाची पर्वा न करता पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा सध्या शेतात ‘रात्रीस खेळ चाले’ प्रमाणे पाणी देण्याचा दिनक्र म सुरू झाला आहे.गेल्या अनेक वर्षानंतर यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला आहे.सध्या नायगाव खो-यात रब्बी हंगामातील कांदा, गव्हु, टमाटे, कोबी, फ्लावर आदींसह विविध पिके जोमात आहे. मात्र ऐन मोसमात आलेल्या पिकांना वीज वितरण कंपनीच्या वाढत्या भारनियमन, रोहित्रांचा खोळंबा तसेच भारनियमनाचे नियोजन शुन्य कारभारामुळे विहीरीत पाणी असतांनाही शेतातील पिके पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीच्या वाढत्या भरनियमन व रोहित्रांची नादुरूस्तीमुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.नायगाव परिसरातील सर्वच गावांमध्ये दिवसा आठ तास तर रात्री दहा तास थ्री फेजचा वीज पुरवठा केला जातो . त्यातही दिवसाच्या वेळेत अचानक अतिरिक्त भारनियमन तसेच रोहित्र बिघाडाचे खोळंब्यामुळे पाणी उपलब्ध असतांनाही पिकांना देता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. सध्या वातावरणात थंडी बरोबरच उन्हाची तीव्रताही वाढली आहे.त्यामुळे पिकांना वेळेत पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा परिसस्थतीत शेतकरी रात्रीच्या वेळेत असणाºया थ्री फेज वीज पुरवठ्याच्या वेळेत पाणी भरण्याला पसंती देत आहे. पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी देणाºयाशेतक-यांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.शिवारातील सर्वच कानाकोप-यात रात्रीच्या वेळी शेतक-यांचा शांत वातावरणात बोलण्याचा आवाज ब-याच अंतरावर ऐकू येत आहे.वाढत्या थंडी बरोवरच परिसरात बिबट्यांचा वाढता संचार असतांना आपला जीव मुठीत धरून शेतकरी पिके वाचिवण्यासाठी रात्रीचा दिवस करून पिकांना वेळेत पाणी देण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.आज पर्यंत शेतकरी शेतात दिवसभर कष्ट करून रात्रीच्या वेळेत विश्रांतीसाठी घराकडे परतायचा सध्या मात्र भारिनयमणामुळे शेतातील पिकांसाठी ‘रात्रीस खेळ चाले’ अशी गत झाली आहे.
वाढत्या भारनियमनाने बळीराजा हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 3:09 PM