नाशिक शहरातील रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात काहीशी समाधानकारक परिस्थिती होती. परंतु नाशिकला लागून असलेल्या काही तालुक्यांचा नाशिक शहराशी व्यापार, उद्योगधंद्याशी संबंधित संबंध अधिक असल्याने त्यांचे येणे-जाणे ग्रामीण भागातील कोरोना वाढीला कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. त्यातही विशेष करून सिन्नर, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश अधिक आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अचानक रुग्णांची संख्या वाढीस लागली असली तरी, आरोग्य खात्याच्या मते ही आकडेवारी कोरोना चाचणी वाढविल्यामुळे वाढल्याचे सांगण्यात आले. एका कोरोनाबाधित रुग्णामागे किमान चार ते पाच जणांची चाचणी करण्यात येत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.
---------------
ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार केले जात असून, रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे, त्या ठिकाणी रुग्ण दाखल केले जात आहेत.
--------------
अंगावर काढल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले
ग्रामीण भागातील जनतेत कोरोनाविषयक जागृतीचा अभाव असून, त्यामुळेच रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकल्याला किरकोळ आजार समजून त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने व नंतर प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होत असल्याने ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
------------------
ऑक्सिजन बेड्सची मारामार
१) नाशिक- ८२-९९-१२
२) बागलाण-२५-९-०
३) चांदवड-१६-३३-६
४) देवळा-४-२९-१
५) दिंडोरी- ८१-३६-३
६) इगतपुरी-२७-१८-३
७) कळवण-३९-२६-१
८) मालेगाव- २१-२२-३३
९) नांदगाव- २१-२८-५
१०) निफाड- ५६-१०२-१०
११) पेठ- १४-२-१
१२) सिन्नर- ८७-६५-६
१३) सुरगाणा- १९-१-२
१४) त्र्यंबक- ६१-२०-६
१५) येवला- ७५-४६-२
---------------------
जिल्ह्यात मृृत्यूचे तांडव (ग्राफ)
नाशिक- ११९
बागलाण- ८४
चांदवड- ५९
देवळा- ४१
दिंडोरी- ६९
इगतपुरी- ६०
कळवण- २१
मालेगाव- ९०
नांदगाव- ९७
निफाड- १८३
पेठ- ६
सिन्नर- १३५
सुरगाणा- ४
त्र्यंबकेश्वर- १९
येवला- ७४
---------------------
जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्या
नाशिक- १७५७
बागलाण- १५००
चांदवड- १६२७
देवळा- १२१०
दिंडोरी- १४३९
इगतपुरी- ५३५
कळवण- ७७६
मालेगाव- ९४०
नांदगाव- ९२८
निफाड- ३१७५
पेठ- २३१
सिन्नर- १७७६
सुरगाणा- ३६३
त्र्यंबकेश्वर- ६१०
येवला- ८१३
------------------
परिस्थिती नियंत्रणात
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढून मृत्यू होत असले तरी, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या व त्या प्रमाणात रुग्णांची संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आहे. आरोग्य विभाग दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी