नाशिक : ‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ ये देश हैं वीर जवानो का...’, ‘जींदगी मौत ना बन जायें संभालो यारो..., अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली येथील वायूसेना केंद्राच्या वतीने आयोजित भारतीय संरक्षण व स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि संगीत संध्या मैफलीचे. उंटवाडी येथील सिटी सेंटरमॉलमध्ये शनिवारी (दि.११) झालेल्या या देशभक्तीपर कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवळाली केंद्राचे एअर कमांडोर विशिष्ट सेवा मेडल रवी शर्मा यांच्यासह वायुदलाचे विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते.
भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:38 PM
पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली.
ठळक मुद्देये देश हैं वीर जवानो का..., ऐ मेरे वतन के लोगो..., या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली