येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
भारतीय हवामान जैवविविधतेसाठी आदर्श स्वरूपाचे असून, त्यामुळे भारतात सधनता होती. ज्या देशात जैवविविधता आढळत नाही तो देश आर्थिकदृष्ट्याही सधन नव्हता. त्या-त्या प्रदेशातील पर्यावरणाशी अनुकूलता साधण्यातून ही जैवविविधता निर्माण होते. ती परस्पर पूरक असते. अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू, औषधी व इतरही सर्वच जीवनावश्यक वस्तू निसर्गातील जैवविविधतेमुळेच आपणास मिळतात. या साधनसंपत्तीचे मोल पैशांमध्ये मोजता येणार नाही, असे सांगून नाशिक जिल्ह्यातील वनस्पती व इतर जैवविविधतेच्या संदर्भातदेखील कोकाटे यांनी माहिती दिली. डाॅ. गौतम कोलते यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य शिवाजी गायकवाड यांनी करून दिला. प्रा. डॉ. धनराज धनगर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. कैलास बच्छाव यांनी आभार मानले. कार्यक्रमास वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुगल मीट ॲपवर हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.