नाशिक : सोळा ट्रिलियनच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा व्यापाराचा हिस्सा केवळ एक टक्का आहे ही खेदाची बाब नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हीच मोठी संधी म्हणून सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. दळणवळनाच्या दृष्टीने भारताचे भौगोलिक स्थान अतिशय उत्तम असून जागतिक बाजारपेठेत मालाचा पुरवठा सहज करू शकतो. त्यामुळे येणाºया काळात निर्यातीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल असा विश्वास फेडरेशन आॅफ इंडियन आॅर्गनायजेशनचे नकु ल बागकर यांनी व्यक्त केला आहे. परदेशांमधील आयात निर्यातीच्या (इम्पोर्ट एक्स्पोर्ट)संधी शोधत असलेल्या उद्योजकासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर आणि फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन तर्फे सारडा संकूलातील राठी सभागृहात निर्यात करतांना परदेशी खरेदीदार शोधण्यासाठी करावी लागणारी कसरत याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे आयात निर्यात समितीचे चेअरमन सी. एस. सिंग, सचिव चंद्रकांत दीक्षित, वक्ते, फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन अक्षय शाह उपस्थित होते. या चर्चासत्रात वव उद्योजक , व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील खरेदीदार शोधण्याची साधने, एक्स्पोर्ट प्रमोशल कॉऊन्सिलची भूमिका आणि निर्यात प्रक्रियेत मिळू शकणारे सहकार्य यासह परदेशी खरेदीदाराशी व्यवहार करतांना घ्यावी लागणारी खबरदारी याबाबत नकुल बागकर यांनी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे प्रश्नोत्ताराद्वारे शंकांचे निराकरण केले. प्रारंभी सी. एस. सिंग यांनी प्रास्ताविक केले. अक्षय शाह यांनी केले. फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशनच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. सहायक सचिव हेमांगी दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर चंद्रकांत दीक्षित यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य चिराग फाल्गुने, सोनल दगडे, सभासद नारायण क्षीरसागर, प्रसाद आडके, अविनाश बनकर, विशाल बाफना, अविनाश यादव, पवन शर्मा, सुनील शिंदे आदीसह आयात निर्यात उद्योजक, व्यापारी उपस्थित होते.
भारताची भौगोलिक परिस्थिती निर्यातीला चालना देणारी -नकुल बागकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 5:45 PM
सोळा ट्रिलियनच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा व्यापाराचा हिस्सा केवळ एक टक्का आहे ही खेदाची बाब नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हीच मोठी संधी म्हणून सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. दळणवळनाच्या दृष्टीने भारताचे भौगोलिक स्थान अतिशय उत्तम असून जागतिक बाजारपेठेत मालाचा पुरवठा सहज करू शकतो. त्यामुळे येणाºया काळात निर्यातीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल असा विश्वास फेडरेशन आॅफ इंडियन आॅर्गनायजेशनचे नकु ल बागकर यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देआयात निर्यातीविषयी मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय व्यापारात खबरदारी बाळगण्याचे आवाहन