नाशिक : परिसरातील सदिच्छानगर भागात विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमधील इंग्लंड-आॅस्ट्रेलियाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघत सट्टा खेळणाºया दोघा सट्टेबाजांना गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा मारून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७मोबाईल, टॅब, लॅपटॉप असा १ लाख २२ हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अधारे इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सदिच्छा नगर येथील रु ंगठा सफायर क्र मांक-२मधील पहिल्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये इंग्लंड विरु द्ध आॅस्ट्रेलिया या क्रि केट सामन्याचे प्रक्षेपण बघून लोकांकडून पैज लावत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. चौगुले यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक सचिन खैरनार , महेश कुलकर्णी, बलराम पालकर, रवींद्र बागुल, मुदीर शेख आदिंच्या पथकाने संशयित इमारतीमधील घरावर छापा मारला. यावेळी संशयित आरोपी निशिकांत प्रभाकर पगार (रा. रविवराज अपार्टमेंट, तपोवनरोड) महेंद्र अशोक वैष्णव (रा. शामपुजा अपार्टमेंट, हिरावाडी) यांना ताब्यात घेतले. हे दोघे संशयित एका एलईडी टीव्हीवर विश्वचषकाच्या उपांत्यफेरीमधील इंग्लंड विरु द्ध आॅस्ट्रेलियाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण बघत लोकांकडून पैंज लावून जुगाराचा खेळ स्वत:च्या फायद्याकरिता खेळताना मिळून आले. त्यांच्याविरूध्द पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.