नाशिक : इंदिरानगर परिसरात व्यावसायिकाची जबरी लूट करुन सशस्त्र हल्ला चढवून ठार मारल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अजून एक संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरूवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. तसेच या गुन्ह्यातील दोघा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने येत्या २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी इंदिरानगरला गेल्या मंगळवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास व्यावसायिक अविनाश महादेव शिंदे यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन सुमारे सहा लाखांची जबरी लूट करण्यात आली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आठवडाभरानंतर गुन्हे शाखा व पंचवटी पोलीसांना संशयित आरोपींना जाळ्यात ओढण्यास यश आले आहे. गुन्हे शाखेने बुधवारी चिमा नाना पवार, सुनील रामचंद्र पवार या दोघांना बेड्या ठोकल्या. दोघे फुलेनगर पेठरोड येथील रहिवाशी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली. या गुन्ह्यातील मुख्य संशयितांपैकी एक विलास राजू मिरजकर (२६, रा.तेलंगवाडी, पेठरोड) याच्या मुसक्या आवळल्या. विलास हा गुन्हा घडल्यापासून कुटुंबियांसह फरार झाला होता. हाती आलेल्या धागेदोऱ्यांवर पंचवटी पोलिसांनी त्याचा माग क ाढण्यास सुरूवात केली; मात्र विलास हा सातत्याने शहरे बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण होत होते. सहायक निरिक्षक रघुनाथ शेगर, सुरेश नरवडे, महेश साळुंके, संदीप काकड, विलास चारोस्कर यांनी भुसावळ गाठले. भुसावळ हे त्याचे मुळ गाव असल्याचे समजते. येथे नातेवाईकांच्या घरात तो दडून बसला होता. पथकाने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक मोपेड दुचाकीसह ३४ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आल्याचे समजते.--इन्फो--इंदिरानगर पोलिसांसह परिमंडळ-२ अपयशीया गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट-१ व इंदिरानगर पोलिसांकडून समांतर तपास केला जात होता. या गुन्ह्यात कोण अगोदर संशयितांचा माग काढण्यास यशस्वी ठरतो अशी चढाओढ तपासी पथकांमध्ये लागल्याने आपअपासांमधील समन्वय बिघडला. परिणामी संशयितांनाही कुणकुण लागली आणि त्यांनी पळून जाण्याचा बेत आखल्याचे समजताच गुन्हे शाखेने दोघा पवारांना जेरबंद केले; मात्र यांपैकी एक मुख्य संशयित पोलिसांच्या हाती लागू शकला नव्हता, त्याच्या मुसक्या पंचवटी पोलिसांनी बांधल्या. इंदिरानगर पोलिसांना यामध्ये अद्याप यश आलेले नाही. उर्वरित दोघे संशयित अद्याप फरार आहेत. परिमंडळ दोन मधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारीने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. या परिमंडळच्या हद्दीत असलेल्या पोलीस ठाण्यांना गुन्ह्यांची उकल करणे अवघड होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हा इंदिरानगरच्या हद्दीत घडला असतानाही अद्याप दोन संशयित गुन्हे शाखेने तर एकास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित दोघांच्या मुसक्या आवळण्याची संधी इंदिरानगर पोलिसांना आहे; मात्र समांतर तपासादरम्यान तपासी पथकांत चढाओढ सुरू झाल्याने कोण बाजी मारेल हे लवकरच दिसून येईल.
इंदिरानगर : व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 8:40 PM
फुलेनगर पेठरोड येथील रहिवाशी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली.
ठळक मुद्देपथकाने त्यास सापळा लावून ताब्यात घेतलेउर्वरित दोघे संशयित अद्याप फरार आहेत.तपासादरम्यान तपासी पथकांत चढाओढ सुरू