लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, दोन लाख रुपये खर्च करून गावातील व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदीची पाहणी केली असता, गावात व्यायामशाळाच अस्तित्वात नसताना व्यायामाचे साहित्य खरेदी कोठून केले गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाºयांनी आपला अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला आहे.इंदोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केल्या होत्या, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाकडेही तक्रारी झाल्याने त्याची चौकशी करण्यात आली असता, अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर दलित वस्तीमध्ये १९९७-९८ मध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्च करून समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, सन २००८-०९ मध्ये दीड लाखाची पाइपलाइन व पाण्याची टाकी बांधण्यात आल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात इंदोरे गावातील दलित वस्तीत सभामंडप नसून समाजमंदिराचे काम झालेले आहे तर दलित वस्तीत फक्त एकच पाण्याची टाकी आढळून आली असून, नवीन पाइपलाइनचा पुरावा कोठेही दिसत नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच व्यक्तीला दोन वेळा घरकुलाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीत सन २०१६-१७ या कालावधीत ठक्करबाप्पा योजना, पेसा, वित्त आयोग व दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत लाखो रुपयांचे रस्त्यांचे कॉँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली, परंतु या कामांची निविदा न काढताच, कामे करण्यात आल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामसेवक ए. एम. सुपे हे चौकशीत दोषी आढळले असून, त्यांच्याबाबतचा सविस्तर अहवालाही सादर करण्यात आला आहे. परंतु गटविकास अधिकाºयांकडून त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. साहित्याची खरेदी कोठे गेली ?इंदोरे गावासाठी आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१३-१४ या वर्षासाठी व्यायामशाळा विकास अनुदान म्हणून दोन लाख रुपये व्यायामशाळेच्या साहित्यासाठी खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात इंदोरे गावात कोठेही व्यायामशाळा नसल्याचे चौकशीत आढळून आल्याने केलेली साहित्याची खरेदी कोठे गेली, असा प्रश्न पडला आहे.
इंदोरे ग्रामपंचायतीची व्यायामशाळाच गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:49 AM
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, दोन लाख रुपये खर्च करून गावातील व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदीची पाहणी केली असता, गावात व्यायामशाळाच अस्तित्वात नसताना व्यायामाचे साहित्य खरेदी कोठून केले गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाºयांनी आपला अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला आहे.
ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी : सभामंडपही अदृश्य