नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला व वर्षभरानंतर त्यांना यश आले. याचा वापर, बिलेट हीटिंग, अपसेटिंग, स्थानिक एनेलिम, ब्रेझिंग, फोर्जिंग फिटिंग आणि इतर विविध औद्योगिक प्रक्रि यांमध्ये केला जातो. प्रत्येक टप्प्यात व्होल्टेज मॉनिटरिंगवर लक्ष केंद्रीत करणे आणि टीएफटी प्रदर्शनावर प्रदर्शित करणे, हे कोणत्याही स्थितीत व्होल्टेजमध्ये बदल झाल्यास सिस्टीमला सतर्क करेल आणि तो वीज घटक तसेच विद्युत वापरावर देखरेख ठेवते. प्राचार्य प्रा. डॉ. एस. टी. गंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा प्रकल्प यतिन इंडेस्ट्रॉनिक्स यांनी प्रायोजित केला आहे.
संदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी बनविले ‘इंडक्शन हीटिंग’ मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:27 AM