शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

औद्योगिक वसाहतीला पांजरापोळची जागा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:02 PM

नाशिकला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी आता पांजरापोळची ३०० हेक्टर जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसीकडून हालचाली सुरू झाल्या

सातपूर : नाशिकला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी आता पांजरापोळची ३०० हेक्टर जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसीकडून हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच भूसंपादनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार आहे. जागेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्रात बैठक घेण्यात येऊन पांजरापोळच्या जागेची वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस महसूल विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित न राहिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.  गेल्या अनेक दिवसांपासून निमा, आयमासह विविध औद्योगिक संघटनांकडून मोठे उद्योग यावेत म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. मोठ्या उद्योगांनी नाशिकला यायची तयारी दाखविली तरी जागेचा प्रश्न आहेच. सर्वप्रथम जागा मिळवावी म्हणून स्थानिक जिल्हा प्रशासनबरोबर प्राथमिक बैठक घेऊन पांजरापोळची जागा मागण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार औद्योगिक संघटना, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस पांजरापोळकडे असलेल्या जागेची त्यांना खरोखरच गरज आहे का, अशी विचारणा केली असता पांजरापोळकडे १३९ वर्षांपासून चुंचाळे येथे ३२७ हेक्टर आणि सारोळे येथे १७९ हेक्टर जागा असून, या जागेवर १३०० गोधन आहे. त्यात २४० दुभते प्राणी आहेत आणि ५ ते ६ लाख झाडे आहेत. या जागा खरेदी केलेल्या म्हणजेच पांजरापोळच्या मालकीच्या आहेत, अशी माहिती पांजरापोळच्या अधिकाऱ्यांनी दिली.  पांजरापोळकडे खूप जागा असून, त्यातील काही जागा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी जागा द्यावी. जागा सहज देणार नसतील तर आवश्यक त्या जागेचे भूसंपादन करावे, अशी मागणी उपस्थितांनी केली. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक पी. पी. देशमुख, महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, सरचिटणीस तुषार चव्हाण, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, शशिकांत जाधव, प्रदीप पेशकार, राजेंद्र अहिरे, कमलेश नारंग, राजेंद्र अहिरे, पांजरापोळचे सागर आगळे, तुषार पालेजा, अ‍ॅड. अनिल आहुजा, उदय जोशी आदी उपस्थित होते.सकारात्मक विचार करावापांजरापोळला एवढ्या जागेची खरंच गरज आहे का? त्यातील ३००.२७ हेक्टर जमीन औद्योगिक विकासासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचा सकारात्मक विचार करावा. अन्यथा एमआयडीसीच्या भूसंपादन नियमानुसार जागा ताब्यात घेतली जाईल, असा इशारा एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी या बैठकीत दिला.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक