शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

तणाव टाळल्याने औद्योगिक शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 1:00 AM

केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी आणि नोटबंदी या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला सावरायला थोडा वेळ लागला. काही प्रमाणात कामगारांवरही परिणाम झाला होता. तरीही औद्योगिक कामगारांना हे वर्ष दिलासादायक ठरले आहे.

सातपूर : केंद्र सरकारने लागू केलेला जीएसटी आणि नोटबंदी या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला सावरायला थोडा वेळ लागला. काही प्रमाणात कामगारांवरही परिणाम झाला होता. तरीही औद्योगिक कामगारांना हे वर्ष दिलासादायक ठरले आहे. वेतनवाढीचे करार होण्याबरोबरच संभाव्य संप मिटवून औद्योगिक शांतता अबाधित राखण्यात कामगार उपायुक्त कार्यालयाला यश मिळाले आहे, तर कामगार संघटनांनीदेखील समन्वयाची भूमिका बजावल्यामुळेच सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकले आहे.  वर्षभरात जवळपास आठ ते दहा कारखान्यांतील कामगारांनी वेतनवाढीच्या करारासंबंधात संप पुकारण्याची नोटीस व्यवस्थापनाला बजावली होती. कामगार उपायुक्त कार्यालयाने यशस्वी मध्यस्थी करीत तडजोड घडवून आणल्याने संभाव्य संप मिटलेत. शिवाय वेतनवाढीचे यशस्वी करार झालेले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा, इंडियन रायिटंग (५ युनिट), मेमको, सिप्रा (३ युनिट), जेबीएम आॅटो, आनंद आय पॉवर, हिंदुस्थान नॅशनल ग्लास, केट्रॉस, ग्लॅक्सो, कॉक्स फार्मा आदींसह अन्य कारखान्यांमधील कामगारांना भरघोस वेतनवाढ मिळवून देणारे वेतनवाढीचे करार झालेले आहेत.  महिंद्रा इंटरट्रेड कंपनीत स्थानिक कामगारांचा रोजगाराचा प्रश्न मिटविण्यात यश मिळाले आहे, तर रिलायबल आॅटोटेक, सागर इंडस्ट्रीज, कामगारांनी संपाची नोटीस दिली होती. ही नोटीस मागे घ्यायला भाग पाडून व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात चर्चा घडवून आणली. जिंजर हॉटेल व्यवस्थापनाने २५ कामगारांना कामावरून काढून टाकल्याची तक्रार होती. त्यानंतर त्यांच्या नऊ कामगारांना कामावर घेण्यात आले. त्यामुळे बऱ्यापैकी कामगारांना न्याय देण्यात यश आले आहे.२८६ कामगारांना मिळाली  सव्वा कोटींची थकीत देणीअनेक कारखाना व्यवस्थापन कामगारांची देणी, वेतन थकवतात. असे कामगार दाद मागण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे धाव घेतात. वर्षभरात इनाम बायोटेक, ज्योती स्ट्रक्चर यांसह अनेक कारखान्यांतील ज्या कामगारांनी तक्र ारी दाखल केल्या त्या कामगारांना २८६ कामगारांना एक कोटी १९ लाख ९८ हजार ८३७ रु पयांची देणी, थकीत वेतनवाढ मिळवून दिल्या आहेत, तर रिंगप्लस अ‍ॅक्वा सिन्नर, सगुणा फुड्स, ड्राइव्ह लाइन (पूर्वीची महिंद्रा सोना) या तीन कारखान्यांतील कामगारांना भरघोस वेतन वाढ मिळवून दिल्याने तेथील ३९६ कामगारांना १३ कोटी रु पयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे आणि इंडियन रायिटंग, मेमको, जेबीएम आॅटो या कारखान्यातील कामगारांनादेखील तीन कोटी २८ लाख रु पयांचा आर्थिक लाभ मिळवून दिला आहे, तर १५० हंगामी कामगारांनी कायम करण्यात आले आहे.औद्योगिक क्षेत्रात शांतता अबाधित राखून कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधून संप घडू न देता तसेच निष्पक्षपद्धतीने वेतनवाढीचे यशस्वी करार केलेले आहेत. नाशिकविषयी बाहेर सकारात्मक संदेश जावा. नवीन गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्न करीत आहे. व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांची सहकार्याची भावना राहिल्याने वेतनवाढीचे करार होण्यास मदत झाली आहे.  - रविराज इळवे  सहायक कामगार आयुक्त, नाशिककामगार उपायुक्त कार्यालयाकडून कामगारांना न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला आहे. कामगारांनी दाखल केलेल्या तक्र ारींची तत्काळ दखल घेऊन त्यांना त्यांची थकीत देणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१३ पासून बंद पडलेली एक्सएलओ कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीच कामगारांना त्यांची थकीत देणी मिळवून दिली. कामगारांचा दबाव, संप, अशा परिस्थितीत यशस्वी करार घडवून आणले.  - किशोर दहीफळकर ,सहायक आयुक्त, नाशिक

टॅग्स :Employeeकर्मचारी