नाशिक : औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे.नाशिक विभागात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने घेतल्या जाणाºया काळजीमुळे अपघातांच्या संख्येत व मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. नवीन येणारे उद्योग व तेथील स्वयंचलित यंत्रांमुळे या संख्येत घट झाल्याचे मत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या अपघातांमुळे कामगारांना झालेल्या जखमा काही काळानंतर बºया होतात तर काही अपघातात गंभीर जखमा होऊन कामगारांना कायमचे अपंगत्व अथवा मृत्यू येतो ते कायमस्वरूपी अपघात असतात. हे प्रमाण आता अत्यंत कमी झाले आहे.औद्योगिक अपघातात ‘किरकोळ अपघाताचे प्रमाण’ आणि ‘गंभीर अपघाताचे प्रमाण’ अशा दोन प्रकारांनी मोजतात. अपघातांचे प्रमाण हंगामी रोजगार, कारखान्याबाहेरील काम, कामाची बदलती जागा, अतिरिक्त शारीरिक श्रम, अपुरी जागा आदी कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असते. कोणत्याही उद्योगधंद्यात सुरक्षितता उपायांचे कठोर अवलंबन करणे हाच अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा महत्त्वाचा तोडगा असल्याचे सुरक्षा अधिकारी सांगत आहे. मात्र मागील काही वर्षांपासून नाशिक विभागातील औद्योगिक क्षेत्रात किरकोळ अपघातांचे व अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटल्याचे सकारात्मक चित्र आहे.अशी घ्यायला हवी काळजीहंगामी कामगार भरताना कंत्राटदाराकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी बूट, हातमोजे, हेल्मेट, कोट, चष्मा आदी साहित्यांची पूर्तता कामगारांसाठी करणे आवश्यक आहे. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेकरिता वापरली जाणारी साधनसामग्री आणि ती वापरण्यास कामगार व कर्मचाºयांना योग्य माहिती देणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.ही आहेत अपघाताची प्रमुख कारणेअपघात अनेक कारणांनी होतात. कारखान्यांत मोठमोठ्या वस्तू हलविताना होणाºया अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याची कारणे वस्तू हलविण्याचा रस्ता चांगला नसणे, अवजड वस्तू हालविताना कामगारांत सांघिक दूरदृष्टीचा अभाव असणे, वस्तूंच्या वजनाचा अंदाज नसणे अशा अनेक कारणांमुळे अपघात घडून येतात. याव्यतिरिक्त यांत्रिक अवजारे हाताळताना किंवा अवजड वस्तू कामगारांच्या अंगावर पडून अपघात होतात.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रथम कंत्राटी कामगारांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कंत्राटदारालाही याबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे ठरते. तसेच प्रत्येक कारखान्याने आस्थापनेपासूनच तेथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कामगारांना कामावर घेण्याआधी कामाबाबत संपूर्ण माहिती पुरविणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्याला कामात कुठलाही अडथळा येणार नाही.- देवीदास गोरे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग
औद्योगिक क्षेत्रातील अपघातांना बसला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:39 AM