नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ या गावाचे सरपंच प्रकाश जाणू मौळे उद्योन्मुख ठरले. याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. रस्त्यांचे कॉँक्रीटीकरण केले. कचऱ्याच्या माध्यमातून कंपोस्ट खतनिर्मीती केली. घरोघरी एलईडी बल्ब व वायरचा पुरवठा केला. वीस गावांना ४५ हजार ताड बियांची लागवड करून दिली. महिला बचतगटांद्वारे रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘रोजगार निर्मिती’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्र्यंबकेश्वरमधील बेरवळचे प्रकाश मौळे हे ठरले उद्योन्मुख सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 8:34 PM