नाशिक : जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे.रोटरी क्लबनाशिकतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात मंगळवारी (दि.१७) प्रमुख पाहुणे विवेक घळसासी यांनी ‘स्वप्नांची आशा, विकासाची दिशा’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना मानवी स्वप्न पाहण्याची वृत्ती आणि विकासाच्या भ्रामक कल्पना याविषयी सविस्तर विवेचन केले. व्यासपीठावर रोटरी क्लब नाशिकच्या सचिव डॉ. श्रेया कुलकर्णी, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नीलेश कोटकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष अॅड. मनिष चिंधडे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले.रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांत सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या पाच शिक्षकांचा यावेळी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ पुरस्क ाराने सन्मान करण्यात आला. यात नॅब स्कूलच्या प्राचार्य वर्षा साळुंखे यांचा दिव्यांगांच्या शिक्षणातील योगदानासाठी, वंदना खरोटे यांचा कला, सोपानवाटपाडे यांचा शिवचरित्र व शिक्षण क्षेत्र, शांताराम मेने यांचाक्रीडा व रागिणी कामतीकर यांचा संगीत श्रेत्रातील योगदानासाठी‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.
संस्कृती उखडून टाकण्याचे उद्योग: विवेक घळसासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:59 AM
जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्दे भय, नकारात्मकता पसरवित असल्याचे मत