नाशिक : सामाजिक उद्योजक आणि व्हीएनडब्ल्यू या संस्थेचे सल्लागार विजय वानखेडे यांनी बेरोजगार तरुणांसाठी उद्योग व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना केली असून, या फाउंडेशनमार्फत उद्योग व्यवसायाचे धडे देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे़ तसेच उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़ उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी शासनाच्या अनेक योजना असून, काही अडचणींमुळे या योजनांचा लाभ मिळू शकत नाही़ त्यामुळे वानखेडे यांनी स्टार्टअप फाउंडेशनची स्थापना करून बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले आहे़ त्यामुळे बेरोजगार युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, किशोरवयीन होतकरू मुले यांना छोटे-छोटे व्यवसाय सुरू करण्यास, सहकार्य मिळणार आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली़
स्टार्टअप फाउंडेशनमार्फत युवकांना उद्योगासंबंधी मोटिव्हेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:12 AM