नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्यासह नगरसेविकांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना अर्भक मृत्यूप्रकरणी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, इंदिरा गांधी रुग्णालयात काही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेला आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाºया गर्भवती महिलांची संख्या जास्त असून, केवळ दोन स्त्रीरोग तज्ज्ञ तेथे आहेत. सकाळी १० ते २ या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी कोणीही स्त्रीरोगतज्ज्ञ तेथे उपस्थित नसतात. बºयाचदा परिचारिकांकडून प्रसूती उरकल्या जातात. मंगळवारी अर्भकाचा बळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. प्रसूतीनंतर बाळाला खासगी रुग्णालयात पाठविणे हा कट प्रॅक्टिसचा भाग असू शकतो. महापालिकेने त्वरित रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करावी व नवजात बालकांवर तातडीने उपचारासाठी एनआयसीयू व्हॅन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक समिना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, सुरेखा निमसे, रंजना गांगुर्डे, रजनी चौरसिया, संगीता गांगुर्डे, कामिनी वाघ, मीना गायकवाड आदी उपस्थित होत्या.लोकमान्य नवक्रांती सेनेचेही निवेदनअर्भक मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टर व कर्मचाºयांवर त्वरित निलंबनाची मागणी लोकमान्य नवक्रांती सेनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याचवेळी मनपा रुग्णालयांमध्ये एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरुण परेवाल, शहराध्यक्ष लवेश राय, बी. जी. गांगुर्डे, हेमा राय, जावेद पंजाबी, साजिद अन्सारी, आनंद राय, जाधव, इरफान खान, सलीम शेख आदी उपस्थित होते.
अर्भक मृत्यू प्रकरण : राष्टÑवादी महिला आघाडीचे निवेदन मनपा वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:30 AM
नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असून, याप्रकरणी डॉक्टरवर उचित कारवाई न झाल्यास आणि आवश्यक सोई-सुविधा न पुरविल्यास मनपाच्या वैद्यकीय विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने निवेदनाद्वारे दिला आहे.
ठळक मुद्देकाही महिन्यांच्या अंतराने दुसरा बळी गेलाबळी हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच