नाशिक : शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. शाळेच्या मराठी माध्यमाच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये ‘आम्ही पावनमित्र’ हे नाटक सादर केले होते. उत्कृष्ठ सादरीकरणामुळे त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. यासाठी या नाटकास रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन वृषाली घोलप यांनी केले होते. दिग्दर्शनासाठी त्यांनाही प्रथम क्र मांकाचे बक्षिस म्हणून देण्यात आले. या त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र रोख प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नाटकाचे संगीत व नेपथ्य स्वाती गडाख यांनी केले. तसेच नाटकातील बालकलाकार कामाक्षी सोनवणे हिला उत्कृष्ट अभिनयासाठी तृतीय क्र मांक मिळाला यासाठी तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. नाटकासाठी मुख्याध्यापिका मानसी बापट यांचे मार्गदर्शन लाभले.
आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत शिशु विहार शाळा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 1:15 PM
शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
ठळक मुद्देआंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला‘आम्ही पावनमित्र’ हे नाटक सादर केले