नाशिक : जिल्ह्याची कोरोना- बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. ४) जिल्ह्यात नव्याने १ हजार ११२ रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ५६५ इतकी झाली आहे. दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा ९११ इतका झाला आहे.शहरात संशयित रुग्णांसह कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. शहरवासीयांकरिता कोरोनासंक्र मणाचा धोका वाढला आहे. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे.१ लाख ४० हजार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी शुक्रवारी ग्रामीण भागात केवळ १६९ बाधित रुग्ण आढळले.जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार १६२ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७ हजार ४९२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.७८ टक्के इतके आहे. शुक्रवारी ११ रुग्ण मृत्युमुखी पडले. यामध्ये शहरातील ५, तर ग्रामीण भागातील सहा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ९६ हजार १७८ रुग्ण निगेटिव्ह आले असून, ३ हजार ३३ रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. एकूण १ लाख ४० हजार ७७६ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.गेल्या पाच महिन्यांपासून जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ५५४ संशयितरु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार २७०रु ग्ण शहरातील आहेत.शुक्रवारीदेखील सर्वाधिक ९३३ शहरात, तर ग्रामीण भागात १६९ रुग्ण मिळून आले. दिवसभरात १ हजार २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आठवडाभरापूर्वी बाधित रुग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
संसर्ग : जिल्ह्यात दिवसभरात आढळले अकराशे रुग्ण एक हजार रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 1:30 AM