शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

शहरात दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:34 AM

शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे लहान बालकांसह मोठ्यांनादेखील पोटदुखी, उलट्या होत असल्याने महिलावर्गात तीव्र संतापाची लाट पसरली असून, नागरिक मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

सिडको : शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यामुळे लहान बालकांसह मोठ्यांनादेखील पोटदुखी, उलट्या होत असल्याने महिलावर्गात तीव्र संतापाची लाट पसरली असून, नागरिक मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.महापालिकेच्या वतीने सिडकोतील संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ तसेच पाथर्डी फाट्यापासून ते अश्विननगर, मोरवाडी, पेलिकन पार्क परिसर, स्टेट बॅँक परिसर, दत्त चौक या भागाला गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने जलवाहिनी फुटणे किंवा तत्सम प्रकार होतात आणि गटारीचे पाणी जलवाहिनीत मिसळते. तथापि, हे ज्ञात असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची पूर्वदक्षता घेतली जात नाही. मध्यंतरी दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. हे पाणीदेखील दूषित असल्याची तक्रार होती.सिडको भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत होता. परंतु मनपाच्या वतीने यात भर म्हणून सिडकोवासीयांसाठी मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा होत आहे. यातील पहिला टप्पा हा सिडकोतील संपूर्ण प्रभाग क्रमांक २४ तसेच पाथर्डी फाट्यासह अश्विननगर व परिसरात पाणीपुरवठा केला जात आहे.नियोजन विस्कळीतसिडकोला शिवाजीनगर जलकुंभ तसेच आता मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परिसरात पाणीपुरवठा वाढला असला तरी प्रशासनाचे नियोजन चुकत असून, त्यामुळेच मुबलक पाणी असतानाही अपुरा तसेच दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, चौकशीची मागणी केली आहे.सिन्नर फाटाही बाधितनाशिकरोड : सिन्नर फाटा स्टेशनवाडी भागामध्ये जुन्या व नवीन पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मनपा पाणीपुरवठा विभाग दूषित पाणी मिसळण्याचे ठिकाण शोधण्यासाठी झटत आहे.सिन्नरफाटा स्टेशनवाडी भागातील विष्णूनगर व गोदरेजवाडी येथे मनपाची जुनी व नवीन पाण्याची पाइपलाइन आहे. पाण्याच्या पाइपलाइन जवळच गटारी असून, गटार काही ठिकाणी तुंबली आहे. या भागातील काही रहिवाशांनी वैयक्तिक नळ कनेक्शन घेतले आहे. जुनी-नवीन किंवा रहिवाशांच्या नळ कनेक्शनची पाइपलाइन जीर्ण अथवा गळकी झाल्यामुळे तेथून गटारीचे दूषित पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. यामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त झाले असून दूषित

टॅग्स :Healthआरोग्यWaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल