शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

गुरुकुल, महालक्ष्मीनगर भागात निकृ ष्ट दर्जाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:23 PM

चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन; गैरव्यवहार झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य व केंद्र शासन विविध विकासकामांना निधी पुरवत असते. परंतु शासन ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा निधी देत असते तो निधी अधिकारी व ठेकेदार शहराऐवजी स्वत: विकास कसा होईल याकडे जास्त लक्ष देतात. यातूनच शासकीय नियम, मार्गदर्शक तत्त्वे न पाळता अतिशय निकृष्ट दर्जाची कामे केली जातात.याबाबत घुले यांनी नगरविकास मंत्री, राज्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन पाठवून न्याय मागितला आहे. जनतेच्या करातुन व शासनाच्या निधीतून अधिकारी व ठेकेदार जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाची कामे करत असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा नगरवासीयांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कामाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांत रोषशहरातील गुरुकुल कॉलनी, महालक्ष्मीनगर, गुजराथीनगर येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम नगर परिषदेने ऐन पावसाळ्यात सुरू केले. शिवाय झालेले कामही अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे गुणवत्ताहीन झालेले आहे. नगरवासीयांनी संबंधित सर्व विकासकामांची गुणवत्ता चाचणी शासनस्तरावर करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी कामे सुरूच ठेवल्याने कॉलनीवासीयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा