कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जिरवाडे, जामले, दरेगाव,कोसुरडे,भाकुरडे, करंमभेळ, कुंमसाडी आदी भागातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाºया डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत आणि जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे परिसरात व डोंगरांवर सर्वत्र हिरवळ दिसत असते. सागाची झाडे आपल्या मोठमोठ्या पानांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे पश्चिम पट्ट्यातील सागाच्या पानांना काळ्या रंगाच्या अळीने खाल्यामुळे ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले असून पाने नष्ट होत आहेत. त्यामुळे वेळीच या अज्ञात अळींवर उपाययोजना न केल्यास शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. यासाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ. कुवर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सागाच्या झाडांवर अळीचा प्रादूर्भाव; पर्यावरण संस्थेतर्फे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:30 PM