लखमापूर : दिंडोरी तालुक्यात खरीप हंगाम जोरात असून त्याला वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग डोक्याला हात लावीत आहे.खरीप हंगाम तसा शेतकरी वर्गाला अत्यंत खडतर प्रवास करून घ्यावा लागत आहे. रब्बी हंगामाचे नुकसान भरून काढण्यासाठी बळीराजांने खरीप हंगामासाठी चांगली कंबर कसली होती. त्यासाठी शेतकरी वर्गाने या हंगामात नगदी भांडवल देणारे पिक लागवडीसाठी पसंती दिली. त्यात सोयाबीन, मका, मुग, उडीद, भुईमूग, नागली, भात व इतर भाजीपाला पिके घेण्यावर अधिक भर दिला. परंतु याही हंगामाने बळीराजांच्या समोरील समस्या कमी न करता त्या वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.यंदा सोयाबीनच्या झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांचा परिणाम उत्पन्न वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सोयाबीन पिकाची पाने कुर्तडणारी आळी सोयाबीनची पाने खात असून ती पानाची पुर्ण चाळणी करीत आहे. यासाठी शेतकरी वर्गाला अत्यंत महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून त्याची वेळोवेळी फवारणीकरावी लागत आहे. एवढे भांडवल खर्च करून आपल्या हातात उत्पन्नाची भर जास्त कशी येईल. यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.चौकट...१) सोयाबीन बियाने न उगवल्याने अगोदर शेतकरी वर्ग हवालदील.२) सोयाबीन पिकावर दुबार पेरणी चे संकट.३)सोयाबीन उगवण झाली पण पावसाने आपला लहरीपणा दाखवला.४)आता सोयाबीन पिक जोमात पण जास्त ऊंचीचे प्रमाण व पान अळीचा प्रादुर्भाव.प्रतिक्रि या...मागील हंगामात शेतकरी वर्ग वातावरणातील बदलावामुळे व अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत पिकाचा हंगाम घेतो.परंतु या विविध संकटामुळे प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च होऊन ही उत्पन्न काहीच मिळत नाही. सोयाबीन पिकांवर यंदा विविध संकटाचा विळखा पडल्यामुळे सोयाबीनवरील आमची आशा मावळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.- हिरामण मोगल, शेतकरी, लखमापूर.शेतकरी वर्गाने योग्य नियोजन करून व योग्य वेळी अचुक औषधे फवारणी करावी. व विविध रोगाच्या प्रादुर्भावापासून सोयाबीन कशी वाचेल. याची काळजी घ्यावी.- अभिजीत जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका. (फोटो २६ लखमापूर, १, २)
सोयाबीन पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 2:44 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात खरीप हंगाम जोरात असून त्याला वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग डोक्याला हात लावीत आहे.
ठळक मुद्देलखमापूर : झाडाची ऊंची यंदा प्रमाणापेक्षा जास्त