लोहोणेर : कसमादेतील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे, मजुरीची रक्कम अदा करण्याआधीच किटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.देवळा तालुक्यातील गिरणा नदीकाठावरील व कळवण शिवारातील काही शेतकरी अर्ली मक्याचे पीक घेतात. पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने ते नियोजन असते. अशी पिके शेतात डोलू लागले असतांनाच पानांवर आणि पोग्यात लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत आहे. मागील वर्षी असेच आक्र मण झाल्याने मक्याचे नुकसान झाले होते. जोरात पाऊस पडल्यावर या अळीचा नायनाट , परंतु यावर्षी तसा पाऊस न पडल्यास शेतकºयांना महागडी औषधांची फवारणी करावी लागेल.या अळीचे प्रमाण सध्या थोडे कमी असले तरी त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने शेतकºयांनी उपाययोजना करण्यास सुरु वात केली आहे. विठेवाडी, लोहोणेर, खामखेडा, रवळजी, निकवेल आदी भागात अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
शेतकºयांनी बियाणे घेताना ते प्रक्रि यायुक्त व निर्जंतुक असल्याची खात्री करूनच घ्यायला हवे. बियाणे कंपन्यांनीही याबाबत दक्षता घ्यायला हवी. कारण आता या अळीचा नायनाट करण्यासाठी शेतकºयांचा खर्च वाढणार आहे.- कुबेर जाधव, शेती अभ्यासक, विठेवाडी, ता. देवळा