दिंडोरी/जानोरी : परिसरात पिकांवर गोगल गायीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे.अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगलगायचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना नर्सर्रीतील महागड्या रोपांची सांधणी करण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाचे वातावरण चांगले असल्याने शेतकरी आपल्या शेतात लागवड करताना मग्न आहे. प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतात अनेक पिकांची लागवड करीत आहे. त्यात टोमॅटो , वांगे, गिलके , फ्लॉवरस, शिमला मिरची, भोपळा कोबी, तसेच झेंडू अशा अनेक प्रकारांची शेतकरी लागवड करीत आहे. परंतु जानोरी परिसरात गोगलगायीने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अनेक प्रकारच्या पिकांच्या रोपांची नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाला आहे. गोगलगाय रात्रीच्या वेळेस जास्त नुकसान करतात व दिवसा लपून बसतात, त्यामुळे शेतकºयांना गोगलगायींचा नायनाट करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. शेतकºयांनी अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगल गाईंचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे लागवड केलेल्या शेतात पुन्हा नर्सर्रीतून महागडे रोपे आणून सांधण्याची वेळ येत आहे. शेतकºयांनी प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेले उपायस्नेहकिल्ल औषध टाकणे, दुकानातली मिस्त्री झाडांच्या रोपांजवळ टाकने, खायची तंबाखू शेतात टाकने, भेळ मधील मुरमुरेना विषारी औषध लावून शेतात टाकणे,शेतातील गोगलगाई एकत्र गोळा करून मारून टाकणे.मी माझ्या शेतात झेंडूची लागवड केलेली आहे. लागवड करून दहा ते पंधरा दिवस झाले असून माझ्या शेतातील झेंडूच्या रोपांची गोगल गायने अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गोगलगायीला मारण्यासाठी मी अनेक प्रकारचे उपाय केले आहे. परंतु गोगलगायीचे प्रमाण कमी होत नसल्याने शेताचे नुकसान झाले आहे. अनेक वेळा नर्सर्रीतून झेंडूची रोपे विकत आणून सांधण्याचे काम करत आहे.-विलास काठे, शेतकरी, जानोरी
पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 4:48 PM
दिंडोरी/जानोरी : परिसरात पिकांवर गोगल गायीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे.अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगलगायचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना नर्सर्रीतील महागड्या रोपांची सांधणी करण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देदिंडोरी : शेतकरी महागड्या रोपाची सांधणी करून हवालदिल