आज महासभा : रस्ते खडीकरणाच्या नावाखाली सत्ताधिकाºयांची तयारी
नाशिक : गेल्याच वर्षी तब्बल १९२ कोटी रुपयांची रस्ते खडीकरणाची कामे झाली असताना आता निधी नसल्याचे सांगणाºया सत्ताधिकारी आणि प्रशासनाने तब्बल २६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे महासभेत ऐनवेळी घुसवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १६) होणारी सभा गाजण्याची शक्यता आहे.महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाची कामे केली. ही कामे मुख्य रस्ते आणि विशेष करून रिंगरोडची असल्याने अन्य कॉलनी रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांना मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न नागरिक करीत होते. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर असल्याने हीच संधी साधत तत्कालीन मनसेच्या सत्ताधिकाºयांनी तब्बल १९२ कोटी रुपयांची कॉलनीरोड किंवा अंतर्गत रस्त्यांची खडीकरणाची कामे मंजूर करून घेतली होती. आता त्याला वर्ष उलटत नाही तोच आणखी २६० कोटी रुपयांचे रस्ते तातडीने करण्याचे घाटत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव सोमवारी (दि.१६) महासभेत जादा विषयांत घुसवण्याचे घाटत आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दैना झाल्याचे निमित्त करून हा प्रकार केला जात आहे. विशेष म्हणजे सत्ताधिकारी यासंदर्भात प्रशासनाचा प्रस्ताव असल्याचे सांगत असले तरी प्रशासनातील काही अधिकारी खासगीत हा सत्ताधिकाºयांचा दबाव असल्याचे सांगत आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. नागरी कामांसाठी पैसे नसल्याचे निमित्त करीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या दरात वाढ सुचवित आहेत. नगरसेवकांना ७५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला, परंतु तोही देणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या भूमिकेवरून दिसते आहे आणि दुसरीकडे मात्र २६० कोटी रुपये अशाप्रकारे खर्च करण्याचे घाटत असून, त्यामुळे या विसंगतीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.निधी आणणार कुठूनमहापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे प्रशासन नेहमीच जाहीर करीत असते. आता अशीच बिकट स्थिती असल्याने छोटी छोटी नागरी कामे टाळली जातात. अशा स्थितीत महापालिकेच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी कोठून आणणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे.