नाशिक :नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांपैकी काही कैद्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या के.एन.केला शाळेत सुरू केलेल्या कारागृहात हलविण्यात आले आहे. याच तात्पुरत्या कारागृहातील आठ कैद्यांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आल्याने कारागृह व मनपा प्रशासन हादरले आहे.कोरोना संसर्ग प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आतमधील कुठल्याही कैद्याला बाहेर सोडले जात नाही व नवीन येणाºया कैद्यांना कारागृहात न ठेवता कारागृह शेजारील के एन केला शाळेत सुरु करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात पाठविले जाते. तात्पुरत्या कारागृहात जवळपास 300 कैदी आहेत. त्यातील काही कैद्यांना गेल्या काही दिवसात आरोग्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला. जिल्हा रु ग्णालयाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी तात्पुरत्या कारागृहातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरु वात केली. यामध्ये आठ कैद्यांना कोरोनाचीबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे कारागृह प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. यामुळे तात्पुरत्या कारागृहातील कैदी त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेले कारागृह पोलीस व शहर पोलीस यांच्यात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. कारागृह प्रशासनाने जेलरोड पाण्याच्या टाकीजवळील मनपाची शाळा प्रशासनाकडून ताब्यात घेतली असून त्या ठिकाणी तात्पुरत्या कारागृहातील कोरोना बाधित कैद्यांना ठेवले जाणार आहे. बुधवारी व गुरु वारी तात्पुरत्या कारागृहातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी ज्या बंदीवानांना आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी नाही व त्यांना कोरोनाचा संशय नसल्याचा निर्वाळा वैद्यकिय पथकाकडून प्राप्त झाल्यानंतर एकूण अशा १०० कैद्यांना मुख्य मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
मध्यवर्ती कारागृहात शिरकाव; आठ कैदी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:51 PM
तात्पुरत्या कारागृहात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची सहा तासांची ड्यूटी आहे. एका सत्रात येथे किमान १७ अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असतात. चार सत्रांमध्ये जवळपास ६५ कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात.
ठळक मुद्देअन्य बंदीवानांच्या तपासणीला गतीप्रशासनाची चिंता वाढली २० कर्मचा-यांना आरोग्याच्या तक्रारी६५ कर्मचा-यांमध्ये भीतीचे सावट