वटार : सटाणा शरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनानाचे शिरकाव केला असून तालुक्यातील सटाणासह ५० गावात कोरोनानाने शिरकाव केला. तालुक्यातील ७५६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १७ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला असून, आॅगस्ट सप्टेंबरमध्ये कोरोनाचा विस्पोट झाला असून गेल्या ४० दिवसात ५६४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढतच असून, सटाणा शहरासह तालुक्यातील जायखेडा, नामपूर, लखमापूर, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावात सर्वाधिक कोरोना बाधित रु ग्ण सापडल्यामुळे त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांमध्ये देखील पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.तालुक्यातील बाधित रु ग्णांचे अजमेर सौदाणे व डांगसौंदाणे येथील कोविडे केअर सेंटर व उपचार सुरु असून तेथे आरोग्य विभागाच्या टीमने रु ग्णांची पुरेपूर काळजी घेत उपचार करून रु गाणना, मानसिक आधारही दिला जात आहे. तेथे आज २२६ रु गानांवर उपचार सुरु करून ५१३ रु ग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले आहेत.तालुक्यातील आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतत मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान ज्या गावात बाधित रु ग्ण सापडतो त्या गावात दोन-चार दिवस कडकडीत बंद व सुरक्षेच्या नियमांचे कोटेकोर पालन केले जाते. त्यानंतर मात्र सर्व नियम ग्रामीण भागात मोडीत काढले जातात.
आकडेवारी....एकूण बधितांची संख्या ७५६तालुक्यातील कंटेनमेंट झोन ७१तालुक्यातील कंटेनमेंट अॅक्टीव झोन ४९सर्वेक्षणासाठीचे कर्मचारी ३३४सर्वेक्षण केलेली घरे ९४८७तपासलेले नागरिक ४८९६९पूर्णपणे बरे झालेले ५१३उपचार घेत असलेले २२६घेतलेले एकून स्वब २१९७एकूण आलेले निगेटिव्ह १४४१बाधित पुरु ष ४६५बाधित महिला २९१बाधित बालके १०बाधित बालिका ६मे महिन्यातील बधितांची संख्या ८जून - बधितांची संख्या ७०जुलै - बधितांची सांख्या ११४आॅगस्ट - बधितांची सांख्या ४०४सप्टेंबर - बाधितांची संख्या १६०तालुक्यातील नागरिकांना सोशल डीस्टनसिंग,मास्कचा वापर करावा, लहान बालके, वयोवृद्ध नागरिकांची विशेषकरून काळजी घ्यावी तसेच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांना गावाबाहेर १४ दिवस कॉरनटाइन करावे तसेच आपल्या गावात शेजारी जर कोणी बधितल आढळून आला तर शेजारी किंवा संपर्कातील नागरिकांनी कोणतीही माहिती लपवू नये व स्वत:हून आपली चेकिंग करून घ्या म्हणजे आपल्याल्या लवकरात लवकर कोरोनाची साखळी तोडता येईल, ज्या नागरिकांना डायबेटीस, हायपररटेन्शन आहे, आणि ६० वर्षापेक्षा वयजास्त आहेत. त्यांनीतर घराबाहेर पडूच नये व स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा.- हेमंत आहिरराव, तालुका वैद्यकीय अधिकारी बागलाण.