दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून काही कंपन्या याबाबतची माहिती दडवुन ठेवत उपाययोजना करत नसल्याच्या तक्र ारी आल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने दखल घेत तातडीने सर्व कंपन्यांना मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी औद्योगिक कंपन्या असून यात नाशिकसह परिसरातून मोठ्या प्रमाणात अधिकारी, कामगार वर्ग ये-जा करतात. कोरोनाचा संसर्ग थेट कंपन्यांमध्ये पोहचला असून काही कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी बाधित झाल्याचे समजते. अनेक बाधितांचा पत्ता जरी वेगळ्या गावचा असला तरी ते दिम्डोरी परिसरात ये-जा करत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातवरण र्निर्मान झाले आहे. याबाबत प्रशासनाने कंपन्यांना दररोज तपासणी करावी, कुणीही कर्मचारी बाधित आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती प्रशासनास देण्याबाबत सूचित करत पत्र पाठवले होते . मात्र काही कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. दिंडोरी, लखमापूर येथील कंपनीतील दोन कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इतरही तीन ते चार कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना बाधा झाल्याचे स्मजते. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंपन्यांना पुन्हा कर्मचार्यांच्या आरोग्याच्या व परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश दिले आहेत. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिला आहे.
दिंडोरी औद्योगिक वसाहत परिसरात कोरोनाचा शिरकाव; प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 6:26 PM
दिंडोरी : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून काही कंपन्या याबाबतची माहिती दडवुन ठेवत उपाययोजना करत नसल्याच्या तक्र ारी आल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुका प्रशासनाने दखल घेत तातडीने सर्व कंपन्यांना मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ठळक मुद्देसूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा