विंचुरीदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथे कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गुरुवारी (दि. २५) दुपारी १ वाजेपासून मंगळवारपर्यंत (दि. ३०) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, धुळवड येथील ७० वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळून आला.विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यात येईल, असा निर्णय कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीने घेतला. नाशिकच्या नोट प्रेसमध्ये नोकरीला असणारा ५३ वर्षीय रुग्ण देवळाली कॅम्प येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. टाइफाइड समजून दवाखान्यात या रुग्णावर उपचार झाले. त्यातून बरा झाला असे समजून रुग्णालयाने गुरुवारीच त्यांना सुट्टी दिली. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घेतलेल्या स्वॅबचा रिपोर्ट बुधवारी सायंकाळी आला. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे सिद्ध झाले.
विंचुरीदळवी येथे कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 9:32 PM
विंचुरीदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथे कोरोनाने शिरकाव केल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत भर पडली आहे. बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गुरुवारी (दि. २५) दुपारी १ वाजेपासून मंगळवारपर्यंत (दि. ३०) संपूर्ण गाव बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, धुळवड येथील ७० वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित आढळून आला.
ठळक मुद्देविनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्यात येईल,