सिडको परिसरात रोडरोमिओंचा त्रास
नाशिक: सिडकोतील काही भागात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. बाजारपेठा तसेच चौकांमध्ये रोडरेामिओंचा महिला आणि मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. काही टवाळखोर आरडाओरड करून सुसाट वेगाने दुचाकी चालवित शांततेचा भंग करीत आहेत. परिसरात दहशत पसरविण्यासाठी दादागिरी आणि तोडफोड करण्याचे प्रकार वाढले आहेत.
फेरीवाला क्षेत्र केवळ नावालाच
नाशिक: शहरात महापालिकेने फेरीवाला क्षेत्र निशिचत केलेले आहेत. मात्र ही क्षेत्रे केवळ नावापुरतीच उरली आहे. फेरीवाल्यांसाठी असलेली क्षेत्रे ओस पडली असून अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला हातगाडी तसेच दुकान मांडले जात आहे. गेल्या आठ महिन्यात तर रस्तोरस्ती अशी दुकाने दिसू लागली आहेत. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
सायकल ट्रॅकचे काम सुरू
नाशिक: गोल्फ क्लब मैदान तसेच जिल्हा रुग्णालयाजवळून सायकल ट्रॅक बनविण्याचे काम सुरू झाले आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत ही कामे केली असल्याचे सांगितले जाते. पुणेप्रमाणेच नाशिमध्येदेखील सायकल ट्रॅक व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामुळे नाशिककरांना लवकरच सायकल ट्रॅक उपलब्ध होणार आहे.