सायगाव : परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. जिल्हा अधिकारी व तालुका कृषी अधिकारी येवला यांनी कपाशी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने सायगाव, ता. येवला येथे कृषी सहायक ज्ञानदेव हारदे, ग्रामसेवक प्रदीप बोडखे यांनी नुकसानग्रस्त कपाशी शेतीचे छायाचित्र मोबाइल अॅपच्या माध्यमातून जीपीस प्रणालीवर अपलोड करून पंचनामे सुरू केले आहे. यावेळी आधार कार्ड नंबर बँक खात्याची नोंद करण्यात येत आहे. कपाशीचे अतिशय अल्प उत्पादन निघाल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी भागुनाथ उशीर यांच्या कपाशी पीक शेतावर बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुनील देशमुख, साहेबराव उशीर, अनिल देशमुख, बबन सोनवणे, सोपान लोहकरे, रमेश पठारे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मुखेडला पंचनामे करण्यास सुरुवात मुखेड परिसरात बदलते वातावरण ,सकाळी पडणारे दाट धुके यापासून होणाºया विविध किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकºयांनी महागडी कीटकनाशके फवारली परंतु याचा काही एक उपयोग झाला नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मुखेड,मानोरी बुद्रुक, सत्यगाव, देशमाने येथील शेतकºयांच्या कपाशीचे पीक बोंडअळीच्या प्रादुर्भावाने प्रदूषित झाल्याचं शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे.४प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुखेड येथेही पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे, कृषी सहायक आर. ई. कुºहाडे, सरपंच धनंजय आहेर, ग्रामसेवक जी.एल. गायकवाड तसेच शेतकरी उपस्थित होते. कपाशी पिकाला केलेली मेहनत व्यर्थयेवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून, कपाशी पिकाला केलेली सर्व मेहनत व्यर्थ गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सततचे बदलत असलेले वातावरण आणि सकाळी पडणाºया दाट धुक्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला होता. वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांचा वापर करूनही काही एक उपयोग होत नसल्याने तोंडचा आलेला घास पळाल्याने शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत आहे. महसूल विभागाला तातडीने बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. उसनवारी करून घेतलेले भांडवल कशाच्या आधारावर परत करायचे फेडायचे ? हा गंभीर प्रश्न सध्या शेतक ºयांसमोर उभा राहिला आहे. यावेळी कृषी सहायक श्रीमती तागड, ग्रामसेवक मच्छिंद्र देशमुख, ईश्वर ढमाले, प्रवीण सोनवणे, हरीश ठाकरे, राजेंद्र कोटमे, सुरेश कोटमे आदी शेतकरी उपस्थित होते.शासनाच्या अपुºया कर्मचारी वर्गामुळे बोंडअळीच्या पंचनाम्याचे काम संथगतीने सुरू असून, शेतकरी गोंधळात सापडला आहे. शासनाने पंचनाम्यासाठी कर्मचारी वाढवावे व शेतकºयांना दिलासा द्यावा.- भागुनाथ उशीर, चेअरमन, येवला तालुका खरेदी-विक्र ी संघ, येवला
सायगावी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:24 PM