एकलहरे : तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.एकलहरे परिसरारातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरातील शेतकरी अजूनही कांदे लागवड करताना दिसतात. अनेक ठिकाणी कांदेलागवड होऊन महिना दोन महिने झाले आहेत, अशा ठिकाणी शेतकरी पिकांना खते देणे, पाणी देणे, निंदणी करणे, द्राक्षांची खुडणी करणे आदी कामात व्यस्त आहेत. काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड सुरू असलेली दिसते. टमाटे, कोथिंबीर लागवड करून साधारण तीन आठवडे झाल्याने युरिया खत देऊन पाणी भरणे सुरू आहे. काही ठिकाणी पूर्ण वाढ झालेली कोथिंबीर उपटून, जुड्या बांधून मार्केटला नेतात. सध्या सुमारे ७०० रु पये शेकडा कोथिंबीर व्यापारी खरेदी करतात.काही ठिकाणी भेंडी, वाल, घेवडा या वेलवर्गीय पालेभाज्या काढून मार्केटला पाठविल्या जातात. त्याबरोबरच कोबी, फ्लॉवर या भाज्याही काढून बाजारात नेल्या जातात, मात्र सध्या वाटाणा, गाजर व इतर पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोबी, फ्लॉवरच्या भावात घट झाली आहे. व्यापारी २ ते ३ रु पये कोबी, ४ ते ५ रु पये फ्लॉवर नगाप्रमाणे खरेदी करतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही, अशीतक्रार शेतकरी करतात. सध्या वातावरणातील बदल व ढगाळ हवामानामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, थ्रीप्स या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते.गव्हाचे क्षेत्र जोमात, हरभरा जेमतेमतालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके म्हणजे गहू व हरभरा ही आहेत. यंदा अतिपावसामुळे शेतात उशिरापर्यंत ओलावा टिकून होता. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाची पेरणी उशिरा झाली आहे. आगाऊ पेरलेला गहू आता ओंब्यांवर आला आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे वाढलेल्या रोगराईपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी गव्हावर औषधे फवारणी सुरू आहे. हरभरा कमी प्रमाणात लागवड केलेला दिसतो. काही ठिकाणी हरभऱ्याला घाटे लागवड झालेली दिसते. पूर्व भागात पिकांना पाणी देण्यासाठी शेततळी, विहिरी खोदून पाण्याचा साठा केलेला दिसतो. दारण व गोदावरी नद्यांमध्ये हा भाग येत असल्याने शेतकऱ्यांनी नदीवरून थेट पाइपलाइन टाकून पाणी आणले आहे. हे पाणी शेततळ्यात अथवा विहिरीत साठवून ठेवले जाते व योग्यवेळी पिकांना दिले जाते.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:52 PM
तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त असलेले दिसतात.
ठळक मुद्देपूर्व भागात ढगाळ हवामान : उत्पादन खर्चात वाढ; भाजीपाल्याची लागवड सुरू