अवकाळी पावसाच्या आठ दहा दिवस आधी काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केलेली होती.शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर ओषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु आता या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडुन त्याच्यांवर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसु लागला आहे. काही शेतकºयांनी कांद्याचे महागडे बियाणे आणुन टाकले होते . सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बियाणे उगवून महिन्याचे झाले आहे. आता एवढ्या पंधरा दिवसात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. पंरतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडुन करपु लागली आहेत. त्यामुळे शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करून रोप व इतर पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीत सुरूवात होते .मात्र या वर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीची चाहूल लागण्याच सुरूवात झाली आहे. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता वाढली आहे.@@ गेल्या दोन -तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणअसल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांनाबसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळीबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसु लागला आहे. यामुळेशेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत शेतकर्यांनामहागडी औषधे घेऊन ती पिकावर फवारणी करत आहे.- ऊमेश खैरनार , शेतकरी
पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 4:10 PM
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हतबल खमताणे : विविध भागात अवकाळी पावसानंतर दररोज वातावरणात शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेल्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असुन, शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधाची फवारणी करित पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.
ठळक मुद्दे मका बाजरी, कांदा व इतर पिंकाचे नुकसान झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर गवत झाले होते. तेव्हा शेतकº्यांनी आहे तसे आवरून शेतकº्यांनी आहे तसे आवरून शेतातील गवताची साफसफाई करून गहू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.