कळवण : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कळवण शहरातील आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करु न शिक्षकांनी तयार केलेल्या व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाईन गृहपाठ घेतला जात आहे.कोरानाच्या पार्श्वभूमीवर आर. के. एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय बंद असले तरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करु न ग्रुपवर अपलोड केले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिजीटल पर्याय अवलंबून ३० वर्गातील २३०० विद्यार्थ्यांना प्रश्नसंच आॅनलाईन दिले जात आहेत. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद असल्याने आर .के.एम विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता यावा यासाठी इयत्ता पाचवी ते नववी व ११ वी च्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट , ईमेल ,जीमेलच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग तुकडी साठी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करण्यात येत आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर अपलोड केले जात आहेत. त्यासाठी सर्व वर्ग तुकडीतील विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असल्याचे प्राचार्य एल .डी .पगार यांनी सांगितले . विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक डी.बी.गावित व बी.पी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. सुट्टीच्या कालावधीत वार्षिक परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचे अभ्यासात सातत्य राहावे . त्यांची पूर्वतयारी व्हावी यासाठी विविध विषयांचे प्रश्नसंच गुगल फार्म, डब्ल्यू पीएफ ,गुगल फॉर्म, वर्ड या डिवाइसचा वापर करून अपलोड केले जात आहेत व विद्यार्थ्यांचा रोजचा प्रतिसाद घेतला जात आहे.