नितीन बोरसेशेतकयांच्या मालकीची संस्था हे धोरण डोळ्यासमोर ठेवून सटाणा बाजार समितीने शेतकºयांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत अधिकाधिक काम संगणीकृत करण्याचा प्रयत्न चालविल्याने त्याचा बाजार समितीला तर फायदा होत आहेच; पण यातून आपण कोणत्या वर्षी काय पिकविले आणि त्याला त्यावेळी काय भाव मिळाला याची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे. जिल्ह्यात प्रथमच सटाणा बाजार समितीने अशा प्रकारचा प्रयोग राबविला आहे. समितीच्या कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून सटाणा बाजार समितीने संपूर्ण कामकाज संगणकीकृत केले आहे. शेतकºयांनी विकलेल्या मालाची गावनिहाय माहिती, कोणत्या शेतकºयाने कोणत्या वर्षी कोणता शेतमाल विकला, त्याला काय भाव मिळाला याची माहितीही आता उपलब्ध होणार आहे. तसेच शेतमालाचे रोजचे बाजारभाव आणि बाजार समितीचे उपक्रम याविषयीची माहिती मिळावी म्हणून बाजार समितीचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यामुळे कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे. लिलाव झालेल्या शेतमालाच्या माहितीसाठी बाजार समितीमधील ३६ मापाºयांना टॅब देण्यात आले आहेत. यामुळे शेतकºयांना विकलेल्या मालाच्या डिजिटल पावत्या मिळत आहे. या टॅबला वायफाय सुविधा दिल्यामुळे त्याची माहिती समितीच्या संकेतस्थळावर अपडेट होणार आहे. हा प्रयोग जिल्ह्यात राबविणारी सटाणा बाजार समिती प्रथम आहे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांना अल्पदरात भोजन मिळावे याची काळजीही बाजार समितीने घेतली आहे. भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकºयाला तीस रुपयात पोटभर जेवण मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाने मुख्य बाजार आवारातील उपहारगृह भाडे न घेता चालविण्यास दिले आहे. जेवनासह शेतकºयांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर.ओ. प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. तासाला पाचशे लिटर शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. देवळा रस्त्याला स्वतंत्र कांदा बाजार सुरू करण्यात आला. या निर्णयामुळे चारशे ते पाचशे वाहनांमधील कांदा लिलाव हजार वाहनांपर्यंत पोहचला आहे.
गावनिहाय शेतमालाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:40 AM