चंदनपुरी शिवारातील शिवाजी पूरकर यांचे शेतात यानिमित्ताने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जमीन आरोग्यपत्रिका वाटप करण्यात आले तसेच माती परीक्षण करून घेणे, जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून १० टक्केपर्यंत रासायनिक खतांची बचत करून जमिनीची प्रत चांगली राखता येते, असे कृषी सहायक बच्छाव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. पोर्टलविषयी मार्गदर्शन केले. शेतकरी गट स्थापना करणे, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा, पीकवीमा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत फळबाग व शेततळे योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी शिवाजी पूरकर, जगन मांडवडे, अशोक सावकार, दत्तू महाजन, सुभाष भामरे, पांडूरंग वडगे, देवमन सावकार, बाळू हिरे, महेंद्र महाजन, निंबा मांडवडे, बाबा गोरल आदी शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
010621\01nsk_28_01062021_13.jpg
===Caption===
कॅप्शन