नाशिक : तालुक्यातील बेळगाव ढगा येथील राज राजेश्वरी शालेय समितीच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेस दीड लाखांचे शालेयपयोगी साहित्य मिळाल्याची बाब विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या दौऱ्यात उघड झाली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नुकतीच बेळगाव ढगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेस भेट देऊन पाहणी केली. श्री राज राजेश्वरी शालेय शिक्षकांनी लोक सहभागातून दीड लाखांच्या वस्तू मिळविल्या. यामध्ये संगरक, एल. सी. डी. प्रोजेक्टर, ई-लर्निंग आदि साहित्य खरेदी करण्यात आल्याची माहिती शाळाप्रमुख मुक्ता पवार यांनी दिली. तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बालस्वच्छता अभियान, वनराई बंधारे, निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त जिल्'ात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांचे डवले यांनी कौतुक केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, शिल्पा अहेर, रवींद्र भदाणे, मुख्याध्यापक पुराणिक, सरपंच सुनीता ढगे, राजाभाऊ ढगे, विष्णू ढगे, दत्तू ढगे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लोकसहभागातून शाळेला मिळाल दीड लाखांचे साहित्य विभागीय आयुक्तांच्या दौऱ्यातील माहिती
By admin | Published: December 14, 2014 1:41 AM