शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

योजनानिहाय तरतुदींची मागविली माहिती

By admin | Published: February 24, 2016 11:28 PM

योजनानिहाय तरतुदींची मागविली माहिती

नाशिक : २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विविध विभागांच्या योजनानिहाय किती रकमेची तरतूद करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्यात यावी, असे आदेश उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती प्रकाश वडजे यांनी दिले आहेत.बुधवारी (दि. २४) यासंदर्भात अर्थसमितीची मासिक बैठक उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस विभागनिहाय सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यात सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विविध विभागाच्या विविध योजनांसाठी किती रकमेची तरतूद करण्यात आली होती, या तरतुदीतून कोणकोणत्या योजना राबविण्यात आल्या, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला.याबाबतची माहिती सर्व विभागांना सादर करण्याच्या सूचना प्रकाश वडजे यांनी दिल्या. तसेच मूळ अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत बदल करून शुद्धिपत्रक पारित केलेले आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती तयार करून पुढील सभेत ठेवावी,अशा सूचना प्रकाश वडजे यांनी विभागाला दिल्या. ही सभा १ मार्च रोजी होणार आहे. अर्थ समितीच्या मासिक बैठकीस स्मिताताई बिवाल, इंदूमती खोसकर, विलास माळी, ताईबाई गायकवाड, मंदाबाई निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.जी. सोनकांबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)