शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

पायाभूत सुविधांवर भर देणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:01 AM

चार महिन्यांपूर्वी याच सरकारने अंतरिम बजेट मांडले होते. तेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे अंतरिम बजेटमध्ये फारसे बदल अपेक्षित नव्हते. ...

चार महिन्यांपूर्वी याच सरकारने अंतरिम बजेट मांडले होते. तेच सरकार पुन्हा सत्तेवर आल्यामुळे अंतरिम बजेटमध्ये फारसे बदल अपेक्षित नव्हते. परंतु, दुसऱ्या टर्ममधील सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणून पुढील पाच वर्षांचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून दिसायला हवा होता, तसा तो पूर्णपणे प्रतिबिंबित झालेला नाही. अर्थात सर्वच बाबी अर्थसंकल्पातून मांडल्या जात नाहीत. औद्योगिकसह अन्य क्षेत्रांतील मंदी, बेरोजगारी या समस्यांना तोंड देण्यासाठी काही मोठ्या शस्त्रक्रिया या सरकारला येत्या पाच वर्षांत कराव्या लागणार आहेत. अंतरिम बजेटमधून शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये, असंघटित क्षेत्रातील कामगारांना ठराविक वयानंतर निश्चित उत्पन्नासाठी पेन्शन योजना, असंघटित कामगारांसाठी तीन हजार निवृत्तिवेतन देणाºया योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून १.५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाºया छोट्या व्यापाºयांना पेन्शन योजना लागू करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, त्यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे. छोट्या करदात्यांना सूट देऊन अतिश्रीमंत करदात्यांकडून ती तूट वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे. तसेच ४०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाºया कंपन्यांच्या कराचा दर ३० वरून २५ टक्के करण्यात आला आहे. तसेच रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी एक कोटींपेक्षा अधिक रकमेची रोख काढली गेल्यास २ टक्के टीडीएस कापून घेण्यात येणार आहे. मात्र, स्त्री सक्षमीकरणासाठीच्या पाच हजारांचा ओव्हरड्राफ्ट आणि एक लाखांपर्यंतचे मुद्रा कर्ज या योजना फारशा फलदायी ठरणार नाहीत. पायाभूत सुविधांवरील १०० लाख कोटी रुपये पूर्णपणे आणि योग्यरितीने वापरल्यास त्यांचा पूर्ण उपयोग होऊ शकणार आहे. स्टॅण्डअप, स्टार्टअप, मेक इन इंडिया, बॅँकिंग क्षेत्राला मदत, पायाभूत सुविधांवर भर या बाबींमुळेच भारतीय अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलरवरून पाच ट्रिलीयन डॉलरवर पोहोचू शकणार आहे. त्यातून औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांतील मंदी दूर करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. केवळ त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते, त्यावर यशापयश अवलंबून राहणार आहे.- तुषार पगार, सनदी लेखापाल

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019chartered accountantसीए