नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव गावात सरपंच संपत धोंडू धोंगडे यांनी पायाभूत सोयीसुविधांवर भर देत गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘पायाभूत सुविधा ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील कु-हेगावा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालगोपाळांना शिक्षणाचा लळा लागावा, यासाठी दोन अंगणवाड्यांचे काम पुर्ण करून घेत प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या बांधकामासही मंजुरी मिळविली. गावातील सर्व उघड्या गटारी भुमिगत करून त्यांचे काम पुर्णत्वाकडे नेले. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विहिरींचे काम पुर्ण केले. स्मशानभूमी व घाट विकसीत करून नागरिकांच्या अखेरच्या प्रवासातील अडचणी दूर केल्या. गावात रस्ते, हायमास्ट, सभामंडप आदिंचे विकासकामे पुर्णत्वास आणली. गावांतर्गत असलेल्या रस्त्यांचे खडीकरण पुर्ण केले. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ु
कु-हेगावच्या गावकऱ्यांना सरपंच संपत धोंगडे यांनी पुरविल्या ‘पायाभूत सुविधा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 6:23 PM
इगतपुरी तालुक्यातील कु-हेगावा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालगोपाळांना शिक्षणाचा लळा लागावा, यासाठी दोन अंगणवाड्यांचे काम पुर्ण
ठळक मुद्देगावांतर्गत असलेल्या रस्त्यांचे खडीकरण पुर्ण