नाशिक : नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे दुथडीभरून वाहिलेल्या पात्रात काठावरी अनेक छोटे मंदिरे आणि मूर्तींचे नुकसान झाले तर काही वाहूनही गेल्या आहेत. या मंदिर आणि मूर्तींचे पावित्र्य राखण्यासाठी ‘नाशिकची आई गोदामाई’ या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.गोदावरीला महापूर आला त्यात धार्मिक स्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच नुकसान नंदिनी नदीतील व किनारी असलेल्या अनेक धार्मिक स्थळांचेही नुकसान झाले. नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रमुख पाच उपनद्या आहेत. अरु णा, वरु णा, वाघाडी, वालदेवी व प्रमुख उपनदी म्हणजे नंदिनी. त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगात उगम पावणारी नदी नाशिक शहरात सातपूर, सिडको, उंटवाडी, उपनगर व पुढे टाकळीजवळ गोदावरीत संगम होतो. गोदावरीच्या किनारी किंवा थेट नदीत अनेक धार्मिक स्थळे आहेत तशीच धार्मिक स्थळे नंदिनी नदीतही आहेत.यावेळी महापुराचा तडाखा या धार्मिक स्थळांना बसला. नदीच्या किनारी असलेली छोटी मंदिरे त्यांचे छप्पर वाहून गेले, तर काहींच्या मूर्तीच वाहून गेल्या. नदीचे पवित्र पुन्हा जपण्यासाठी सिडकोतील ‘नाशिकची आई गोदामाई’ या सामाजिक संस्थेने स्वच्छता मोहीम व विविध उपक्र म सुरू केले आहेत. ज्या ज्या ठिकाणी धार्मिक मंदिरांवर कचरा पालापाचोळा साचला ते स्वच्छ करण्यात येत आहेत. तसेच अनेक वाहून गेलेल्या मूर्ती नदीत दिसत आहेत. त्या पुन: काढून त्यांची विटंबना थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्र मासाठी सचिन महाजन, रोहित कुलकर्णी, रोहन कानकाटे, रवी वाघ, स्वप्नील ठोंबरे, उदय देशमुख, मयूर लवटे, जयेश जाधव, उदय देशमुख, रोहित ताराबादकर, संदीप दिघे, स्वप्नील जाधव, रामेश्वर महाजन, कलमेश भोर, अक्षय परदेशी, अतिश पाटील आदी प्रयत्नशील आहेत.
नंदिनी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:18 AM
नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे दुथडीभरून वाहिलेल्या पात्रात काठावरी अनेक छोटे मंदिरे आणि मूर्तींचे नुकसान झाले तर काही वाहूनही गेल्या आहेत. या मंदिर आणि मूर्तींचे पावित्र्य राखण्यासाठी ‘नाशिकची आई गोदामाई’ या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्देनाशिकची आई गोदामाई उपक्रम : सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुरू