विंचूर : सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. तरुणाई कायम सोशल मीडियावर ‘टाइमपास’ करत असल्याची ओरड असली तरी, येथील युवा लोकप्रतिनिधींनी सोशल मीडिया विधायक कामांसाठी फायदेशीर कसा ठरू शकतो याचा आदर्श पायंडा आपल्या कृतीतून घालून दिला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून ‘सुंदर वॉर्ड, स्वच्छ वॉर्ड’, ‘आपले गाव, सुंदर गाव’, ‘ग्रामसेवा समिती’ असे सामाजिक कामांसाठी अग्रेसर असलेले व्हॉट्सअॅप समूह (ग्रुप) स्वच्छता मोहिमेस मोठा हातभार लावत असल्याचे चित्र आहे. कुणाकडे फोनवरून तक्रार नाही की अर्ज फाटा नाही. गल्लीत अथवा सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसले, की भ्रमणध्वनी काढायचा आणि ठरावीक ग्रुपवर कचºयाच्या ढिगाºयाचे छायाचित्र टाकल्यास त्याची तत्काळ दखल घेतली जात असल्याने गावपातळीवर सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरू लागल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्रुपवर ग्रामपालिका प्रशासन कर्मचारी, अधिकारी असल्याने व्हॉट्सअॅपवरची तक्रार सर्वांपर्यंत घरबसल्या पोहोचत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. येथील युवा उपसरपंच नानासाहेब जेऊघाले यांनी ‘सुंदर वॉर्ड, स्वच्छ वॉर्ड’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केलेला आहे. ग्रुपमध्ये नागरिकांनी फक्त त्यांच्या अडीअडचणी मांडण्याचे आवाहन केले. त्यास मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या स्वच्छतेच्या तक्र ारींचे निवारण होत असल्याने त्यात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे चित्र आहे. घरासमोरील गटार चोकअप असल्यास नागरिक स्वत:चे नाव व गटारीचा फोटो काढून ग्रुपवर टाकतात. ग्रामपालिकेच्या कर्मचाºयांकडूनही तत्काळ त्याची दखल घेतली जात असून, संबंधित कर्मचारी साफसफाई करताना तसेच तक्रार निवारण झाल्याची छायाचित्रे टाकून ‘अपडेट्स’ देत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. माजी सरपंच तथा येथील ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष अविनाश दुसाने यांचा ‘ग्रामसेवा समिती’ हा व्हॉट्सअॅप समूह ग्रामस्वच्छतेला हातभार लावत आहे. ग्रामसेवा समितीच्या वतीने स्वच्छतेचा उपक्रम राबविला जात असून, याचे अपडेट याद्वारे कळविले जात असल्याने तसेच स्वच्छता मोहिमेची छायाचित्रे व्हायरल केली जात असून, ग्रामस्वच्छता अभियान लोकांपर्यंत पोहोचून गावातील इतर बांधवांना स्वच्छतेचे महत्त्व समजण्याबरोबरच प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रि या समिती सदस्यांकडून व्यक्त होत आहे. गावातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांमार्फत आपापल्या वॉर्डात ग्रामस्वच्छतेसह तक्रार निवारणासाठी विविध ग्रुप्स तयार करण्यात आले आहेत. सध्याच्या टेक्नॉलॉजी युगात सोशल मीडियामुळे चांगले विधायक उपक्रमही केले जाऊ शकतात, याची प्रचिती सध्या विंचूरकरांना येत आहे. या सोशल उपक्रमाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने लोकप्रतिनिधीही तक्रारींची तत्काळ दखल घेत आहेत. त्यामुळे गावपातळीवरही सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असून, याद्वारे अनेक विधायक कामेही होऊ शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.इंटरनेटचे चांगले वाईट असे परिणाम होत असले तरी, माणसाच्या सकारात्मक दृष्टिकोनातील कृतीवर त्याचे मोजमाप करणे गरजेचे आहे. घाणीचे साम्राज्य दिसले की घरबसल्या फोटोसहित तक्रार करता येऊन त्याचे निवारण होत असल्याने सोशल मीडिया खरोखरच फायदेमंद ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. छायाचित्रासह तक्रारी एका क्लिकसरशी सर्वांपर्यंत पोहोचत असल्याने तक्र ार वजा सूचना करण्याचे डिजिटल माध्यम फायदेशीर असल्याचे मत नागरिकांनी मांडले. आमच्या गल्लीत आज घंटागाडी आली नाही, गल्लीत कचरा साचलाय... अशा आशयाचा संदेश एका ठरावीक व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला जातो... सोबत कचºयाचे फोटो शेअर केले जातात. काही मिनिटातच लोकप्रतिनीधींचा सोशल रिप्लाय मिळतो... अन् अवघ्या तासाभराच्या आत संबंधित ठिकाणचा कचरा हटविल्याची छायाचित्रे ‘त्या’ ग्रुपवर व्हायरल होतात. भाऊ, बाजारपेठेतील काही भागात अंधाराचे साम्राज्य आहे. स्ट्रीट लाइट बंद आहेत.. असा मेसेज काळोख्या अंधारातील छायाचित्रासह ग्रुपवर धडकतो. काही वेळातच संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे दुसºयाच दिवशी तेथे वीजपुरवठा सुरू झालेला असल्याचे छायाचित्र व्हॉट्सअॅपच्या संबंधित ग्रुपवर झळकायला लागते.
विंचूरच्या युवकांचा पुढाकार : घरबसल्या नागरिकांच्या तक्र ारींचे निवारण ग्रामस्वच्छतेला सोशल मीडियाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:09 AM
सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते.
ठळक मुद्देआपले गाव, सुंदर गाव’, ‘ग्रामसेवा समिती’ फोनवरून तक्रार नाही की अर्ज फाटा नाही